Thursday, 25 August 2022

मदर तेरेसा.. गाथा बलिदानाची

  • 🇮🇳 गाथा बलिदानाची🇮🇳

                          

                                           

  





         महान समाज सेविका

        भारतरत्न मदर टेरेसा


“जर जीवन दुसऱ्या करता जगता आले नाही तर ते जीवन नाही"


    जन्म : 26 ऑगस्ट 1910

    ( स्कॉप्जे शहर, मसेदोनिया )


       मृत्यू : 5 सप्टेंबर 1997

             ( कलकत्ता, भारत )


नाव : अगनेस गोंझा बोयाजिजू

वडिल : निकोला बोयाजू

आई  : द्रना बोयाजू

कार्य : मिशनरी ऑफ चैरिटी ची

          स्थापना, मानवतेची सेवा


             या लेखाच्या सुरूवातीला लिहीलेले वाक्य महान समाज सेविका मदर टेरेसा यांचे आहे. या वाक्या नुसार समर्पित आयुष्य जगलेल्या मदर टेरेसा यांनी आयुष्यभर दुसऱ्याची सेवा आणि सहाय्य करत स्वतःला समर्पित केले. ती एक अत्यंत उदार, दयाळु आणि निस्वार्थ प्रेम करणारी महिला होती त्यांच्या रोमा रोमात दया आणि सेवेचा भाव भरून होता. निस्वार्थ भावाने मदर टेरेसा गरिब, आजारी, लाचार, असाहय्य आणि गरजवंतांची मदत करत असत. त्या स्वतःकरता नव्हे तर इतरांकरता जगत होत्या. त्या मुळात भारतिय वंशाच्या नव्हत्या परंतु त्या ज्यावेळी भारतात आल्या तेव्हां त्यांना येथील लोकांकडुन इतके प्रेम आणि स्नेह मिळाला की त्यांनी आपले उरलेले आयुष्य भारतात व्यतीत करण्याचा निर्णय घेतला, ईतकेच नव्हें तर भारतिय समाजात त्यांनी महत्वपुर्ण योगदान देखील दिलं. सामाजिक कार्यात दिलेल्या महत्वपुर्ण योगदानाकरता मदर टेरेसा यांना देशातील सर्वोच्च असा भारत सन्मान देखील मिळाला. पद्मश्री आणि नोबेल पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मदर टेरेसा यांच्याकडुन प्रत्येकाने प्रेरणा घेण्याची गरज आहे. मानवतेचे त्या एक उत्तम उदाहरण ठरल्या, निस्वार्थ आई प्रमाणे सेवाभावाने काळजी घेणाऱ्या मदर टेरेसा यांना गरीबांची कैवारी, दयाळु आई, मदर मेरी आणि विश्वजननी अश्या अनेक नावांनी ओळखत असत. आज या आर्टिकल मधुन आम्ही आपल्याला त्यांच्या जन्मापासुन त्यांचे भारत आगमन आणि समाजाकरता त्यांनी केलेल्या महान कार्यांची, त्यांच्या संघर्षाची माहिती सांगणार आहोत. 


👨‍👩‍👧‍👧 मदर टेरेसा यांचा जन्म आणि परिवार

             26 ऑगस्ट 1910 साली मसेदोनियातील स्कॉप्जे येथे एक साधारण व्यापारी निकोला बोयाजू यांच्या घरी अगनेस गोंझा बोयाजिजू ने जन्म घेतला होता. यानांच पुढे मदर टेरेसा म्हणुन जग ओळखु लागले. गोंझा चा अर्थ अलबेनियन भाषेत ’कळी’ (फुल) असा होतो. त्यांचे वडील निकोला बोयाजू धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते, ईसा मसीह यांच्यावर त्यांचा फार विश्वास. त्या ज्यावेळी 8 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तिचा सांभाळ तिची आई द्राना बोयाजूंनी केला. त्या एक धर्मपरायण आणि आदर्श गृहीणी होत्या, मदर टेरेसांवर आईच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा फार प्रभाव पडला. वडिलांच्या अकाली जाण्याने त्यांच्या घरातील परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती त्यामुळे मदर टेरेसा यांचे लहानपण फार संघर्षमय परिस्थीतीतुन गेले. मदर टेरेसा लहानपणी आपल्या आई आणि बहिणीबरोबर चर्च मधे जाऊन धार्मिक गीत गायन करीत असे. ती ज्यावेळी केवळ 12 वर्षांची होती तेव्हां एका धार्मिक यात्रेला गेलेली असतांना येशुच्या परोपकार आणि समाजसेवेच्या शिकवणीला जगभरात पोहोचविण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला व आपले संपुर्ण जीवन गरिबांच्या सेवेत समर्पित करण्याचा तिने मनोमन निश्चय घेतला होता. 1928 साली ज्यावेळी मदर टेरेसा फक्त 18 वर्षांची होती तेव्हां त्यांनी नन चा समुदाय ’सिस्टर्स ऑफ लोरेटो’ त सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. पुढे त्या आयरलैंड येथे गेल्या आणि इंग्लिश भाषा शिकल्या कारण ’लोरेटो’ च्या सिस्टर्स इंग्रजी माध्यमातुनच भारतात लहान मुलांना शिकविण्याचे कार्य करत होत्या. या दरम्यान त्यांनी एका इन्स्टीटयुट मधुन नन होण्याचे ट्रेनिंग पुर्ण केले. नन झाल्यानंतर त्यांचे सिस्टर मेरी टेरेसा असे नामकरण करण्यात आले. पुढे आपले संपुर्ण जीवन गरीब आणि असाहय्य लोकांच्या मदतीकरता त्या व्यतीत करत्या झाल्या.


मदर टेरेसा यांचे भारतात आगमन

                    मदर टेरेसा आपल्या इन्स्टीटयुट मधील इतर नन समवेत 1929 साली भारतातील दार्जिलींग येथे आल्या. या ठिकाणी नन या रूपात त्यांनी पहिल्यांदा धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर त्यांना कलकत्ता येथे शिक्षीका म्हणुन पाठविण्यात आले. कलकत्ता येथे डबलिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मैरी स्कूल ची स्थापना केली होती. मदर टेरेसा याठिकाणी गरीब आणि असाहय्य मुलांना शिकवीत असत. त्यांचे हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व होते. सुरूवातीपासुनच त्या अत्यंत मेहनती होत्या त्यामुळे त्यांनी हे काम देखील अत्यंत प्रामाणिकतेने आणि निष्ठापुर्वक केले, त्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षीका झाल्या. या दरम्यान त्यांच लक्ष आजुबाजुला पसरलेल्या गरीबी, अनारोग्य, लाचारी, व अज्ञानावर गेलं. ते पाहुन त्या अत्यंत दुःखी झाल्या. हा तो काळ होता जेव्हां दुष्काळामुळे कलकत्ता शहरात मोठया संख्येने मृत्यु होत होते व गरिबीमुळे तेथील जनतेची परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती. हे पाहुन मदर टेरेसा यांनी गरीब, असाहाय्य, आजारी आणि गरजवंतांची सेवा करण्याचा निश्चय केला.


💒मिशनरी ऑफ चॅरीटी ची स्थापना

              गरीब आणि गरजवंतांची मदत करण्याच्या हेतुने मदर टेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पीटल मधुन नर्सिंग चे प्रशिक्षण पुर्ण केले व पुढे 1948 ला कलकत्ता येथे येऊन त्यांनी स्वतःला गरीब, असाहाय्य आणि वृध्द लोकांच्या सेवेत झोकुन दीलं. खुप प्रयत्नांनंतर 7 ऑक्टोबर 1950 ला मदर टेरेसा यांना समाजाच्या हिताकरीता कार्य करणारी मिशनरी ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. मदर टेरेसा यांच्या या संस्थेचा उद्देश केवळ गरीब, गरजवंत, रूग्णं, आणि लाचारांची सहाय्यता करणे आणि त्यांच्यात जगण्याची आस निर्माण करणे हाच होता. या व्यतिरीक्त करूणाहृदयी मदर टेरेसा यांनी ’निर्मल हृदय’ आणि ’निर्मला शिशु भवन’ नावाचे आश्रम सुरू केले. या आश्रमात गरीब आणि आजारी रूग्णांवर उपचार केले जात असत आणि अनाथ व बेघर मुलांची मदत केली जात असे.


👰 मदर टेरेसा यांचे निधन

            मदर टेरेसा यांना आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. 1983 साली ज्यावेळी त्या रोम ला पॉप जॉन पॉल व्दितीय यांच्या भेटीकरता गेल्या तेंव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पुन्हा 1989 साली हृदयविकाराचा झटका आला तरी देखील त्यांनी त्यांचे सेवाकार्य सुरूच ठेवले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती ढासळतच गेली, 1991 ला त्यांना किडनी आणि हृदयाचा त्रास सुरू झाला. 1997 ला मदर टेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी च्या प्रमुख पदावरून निवृत्ती घेतली व 5 सप्टेंबर 1997 ला कलकत्ता येथे अखेरचा श्वास घेतला. अश्या त-हेने या करूणाहृदयी आत्म्याने या जगाचा निरोप घेतला.


🏅 सन्मान/पुरस्कार

                         निस्वार्थ भावनेने गरीब असाहाय्य लोकांची सेवा केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या मानवतेच्या सेवेला पाहुन भारत सरकारने त्यांना 1962 साली पद्मश्री पुरस्काराने गौरविलं. पुढे त्यांना देशातील सर्वोच्च असा ’भारतरत्न ’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या व्यतिरीक्त त्यांना मानव कल्याणार्थ केलेल्या उत्कृष्ट कार्याकरीता 1979 ला नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. या दयासागर हृदयाच्या मातेने नोबेल पुरस्काराची 192,000 डाॅलर धनराशी देखील गरीबांच्या मदतीकरता उपयोगात आणली. याशिवाय 1985 साली त्यांना मेडल ऑफ फ्रीडम अवार्ड ने देखील गौरवान्वित करण्यात आले. मदर टेरेसा यांनी मानव कल्याणाकरता ज्या निस्वार्थ भावनेने कार्य केलं ते खरोखर तारीफ ए काबिल आहे. सर्वांनीच मदर टेरेसा यांच्याकडुन परोपकार, दया, सेवा, यांची प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. या महान आत्म्याला ज्ञानी पंडित च्या संपुर्ण


          🇮🇳 जयहिंद 🇮🇳


 विनम्र अभिवादन

                 

                                                                                                                                                                                                                                        ➖➖➖➖➖➖➖➖➖

Monday, 13 June 2022

वटपौर्णिमा

                            वटसावित्री

नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा  होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्‍न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग ?तर *ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे. .असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही.

 सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, *‘सांग बाबा काही समजावून*!’ असे होते. मग *म्हणालो ‘वहिनी’ बसा*! *विज्ञाननिष्ठा म्हणजे काय* हो?


 *कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना*? त्या म्हणाल्या *हो! बरोबर*.

 मी म्हणालो, *मग आता सांगा* *वडाचीच पूजा का करायची*? *आंबा, फणस, जांभूळ* वा *बाभळीची का नाही*? मी म्हणालो,


 मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. *ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची* *श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही*? *ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती*? मग मी म्हणालो, *हे काहीच माहिती नाही*? *कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही*! तर *मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता*? *बिचारीजवळ उत्तर नव्हते*. अनेकांजवळ नसते. 

*शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका*.


 *जगात सर्वात दाट सावली असते वडा ची*. वडाच्या *पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते*. त्यामुळे *वडाखालील जमीन सदैव ओलसर असते*. याचसाठी *वडाची सावली अद्भुत गुणकारी* आहे, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात-

 कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌

 | शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌

*|*अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते*. या *तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता*.

 *वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य* जगात *सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड*.


 *ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला*. *गरमीने त्रासला*. *प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले*. 

*त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात* आणि *उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले*. हे आहे *पतीचे प्राण वाचविणे*. *बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:*

|’ प्रकारातील *समजायची असते*. *ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा*!

ती म्हणाली *याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट.* 

*सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही*. हा *जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे*.

 *जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात*. *जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.*

 *संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे.* म्हणून *तर ‘तप’ १२ वर्षे*. *नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या*.

 *१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात*. *जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी.* *नवा देह*.


 *असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे*. पूर्वी *विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे*!’ अर्थात *पती १६+८४=१०० वर्षे जगू देत*.


 *शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे*. *वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला*. 

*आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय*? *याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा*!’


*वटसावित्री*! 

*नवीनच लग्न झालेल्या* एका *मित्राकडे* बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी *वटसावित्रीची पौर्णिमा* होती. मी सहज *नवीन वहिनींना प्रश्‍न केला*, काय वहिनी! *झाले का बुकिंग*?तर *ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे*.असल्या *अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही*.

 सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, *‘सांग बाबा काही समजावून*!’ असे होते. मग *म्हणालो ‘वहिनी’ बसा*! *विज्ञाननिष्ठा म्हणजे काय* हो?


 *कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना*? त्या म्हणाल्या *हो! बरोबर*.

 मी म्हणालो, *मग आता सांगा* *वडाचीच पूजा का करायची*? *आंबा, फणस, जांभूळ* वा *बाभळीची का नाही*? मी म्हणालो,


 मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. *ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची* *श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही*? *ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती*? मग मी म्हणालो, *हे काहीच माहिती नाही*? *कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही*! तर *मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता*? *बिचारीजवळ उत्तर नव्हते*. अनेकांजवळ नसते. 

*शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका*.


 *जगात सर्वात दाट सावली असते वडा ची*. वडाच्या *पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते*. त्यामुळे *वडाखालील जमीन सदैव ओलसर असते*. याचसाठी *वडाची सावली अद्भुत गुणकारी* आहे, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात-

 कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌

 | शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌

*|*अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते*. या *तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता*.

 *वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य* जगात *सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड*.


 *ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला*. *गरमीने त्रासला*. *प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले*. 

*त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात* आणि *उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले*. हे आहे *पतीचे प्राण वाचविणे*. *बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:*

|’ प्रकारातील *समजायची असते*. *ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा*!

ती म्हणाली *याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट.* 

*सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही*. हा *जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे*.

 *जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात*. *जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.*

 *संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे.* म्हणून *तर ‘तप’ १२ वर्षे*. *नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या*.

 *१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात*. *जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी.* *नवा देह*.


 *असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे*. पूर्वी *विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे*!’ अर्थात *पती १६+८४=१०० वर्षे जगू देत*.


 *शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे*. *वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला*. 

*आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय*? *याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा*!’


*खूपच छान माहिती* 👌🙏

*नक्की वाचा* 🙏

Monday, 13 September 2021

एक लक्ष्यभेद..

 एक लक्ष्यभेद... 


आजपासून ९ वर्षांपूर्वी २०१२ साली एक कुटुंब जोधपूर, राजस्थान इकडे आपल्या कारमधून निघालं होतं. त्यात १० वर्षांची एक मुलगी जोधपूरला आपण जातो आहोत म्हणून अतिशय आनंदात होती. तिच्या शाळेचा नृत्याचा एक कार्यक्रम होता, ज्यात तिने भाग घेतला होता. लहानपणापासून संगीताच्या तालावर तिचे पाय थिरकत होते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कुटुंबासमोर ते थिरकणार म्हणून ती खूप आनंदात होती. गाडीत तिचे आई, बाबा, भाऊ आणि चुलत भावंडंही होती. प्रवासात त्याच नृत्याची स्वप्नं बघता बघता तिचा डोळा लागला. अचानक त्या स्वप्नातून ती काहीतरी आदळण्याने अर्धवट जागी झाली. तिला काही कळेपर्यंत गाडी रस्त्यावरून २-३ वेळा उलटी पलटी होऊन बाजूच्या शेतात घुसली होती. ती भानावर आली तोवर त्या कोवळ्या मुलीला काय घडलं आहे याचा अंदाज येत नव्हता. तिच्या पाठीतून कळा येत होत्या. तिने पाय हलवण्याचा प्रयत्न केला पण ती हलवू शकली नाही. आपले संगीताच्या तालावर थिरकणारे पाय आज तिला सापडत नव्हते. हे एक वाईट स्वप्न आहे असा विचार ती करायला लागली. हॉस्पिटलमध्ये जाताना कदाचित काही वेळाने आपण स्वतः उठून उभं राहू असंच तिला वाटत होतं. 


दिवसांमागून दिवस गेले, महिने गेले पण तिचे पाय कायमचे हरवले. सहा महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तिला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली पण ती आता स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती. एकेकाळी नाचण्याचे स्वप्न बघून जोधपूरला जाणारी ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती हा धक्का तिच्यासाठी खूप मोठा होता. या घटनेने त्या १० वर्षांच्या चिमुरडीचं आयुष्य संपूर्णपणे बदलून गेलं होतं. सगळ्यात रमणारी, हसणारी ती आता सर्वांपासून लांब झाली. गप्प राहयला लागली. तिचं संपूर्ण विश्व कुठेतरी उध्वस्त झालं होतं. तिच्या वडिलांनी तिला मित्र-मैत्रिणी बनवण्याचा सल्ला दिला. पुन्हा एकदा मोकळ्या आकाशाशी नातं जोडायला सांगितलं पण हे सगळं स्वीकारणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. 


२०१५ साली ९वीच्या सुट्टीमध्ये तिच्या वडिलांनी तिचं मन बाहेरच्या जगात गुंतवण्यासाठी धनुर्विद्या या खेळाशी ओळख करून दिली. पण तिला हे शिवधनुष्य पेलणं जमलं नाही. मग त्यांनी तिला शूटिंग रेंजवर नेलं. तिची ओळख बंदुकीशी करून दिली. ती साधारण ५ किलोची बंदूक उचलून १० मीटरवर निशाणा लावणं तिला जड गेलं, पण तिने आयुष्यात पहिल्यांदा फायर केलेले १० च्या १० शॉट समोरच्या काळ्या वर्तुळात लागले होते. तिकडेच त्या मुलीला आपलं लक्ष्य सापडलं होतं. त्या लक्ष्याला तिने आजच्या ३० ऑगस्ट २०२१ या दिवशी वयाच्या फक्त १९ व्या वर्षी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत जागतिक विक्रमाशी बरोबरी करत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान मिळवताना पूर्ण केलं आहे. ती आहे भारताची पॅरा नेमबाज 'अवनी लेखरा'. 


२०१२ साली झालेल्या घटनेने अवनीचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तिची ओळख अश्या एका आयुष्याशी झाली ज्याची कधी तिने कल्पना केली नव्हती. हे नवीन आयुष्य स्वीकारणं तिला खूप कठीण गेलं. अगदी बसण्यापासून ते रोजच्या रोज सगळी कार्यं करताना तिला आयुष्याची परीक्षा द्यावी लागत होती. हे सोप्पं नव्हतं. तिच्या मते आपण दिव्यांग झालो आहोत हे स्वीकारणं सगळ्यात मोठी गोष्ट होती. आपल्या बाजूचं जे जग बदललेलं आहे ते एकदा का स्वीकारलं की पुढचा प्रवास काय असणार आहे याची कल्पना येऊन त्यावर मार्गक्रमण करणं हा भाग सोपा होता. २०१५ ला शूटिंग रेंजवर नेमबाजी करणं एक टाईमपास म्हणून तिने स्वीकारलं होतं. पण तिचे वडील नेमबाजी या खेळासाठी गंभीर होते. त्यांनी तिला भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राचं आत्मचरित्र आणून दिलं. ते वाचल्यानंतर अवनीच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. ज्या पद्धतीने त्याने भारतासाठी पहिलं ऑलिम्पिकमधलं सुवर्णपदक जिंकलं तसा सन्मान मिळवण्याचं ध्येय तिने निश्चित केलं. 


आधी शाळेतून तर नंतर राज्यस्तरीय स्पर्धेतून तिने आपल्या नेमबाजीची झलक दाखवायला सुरूवात केली. काही स्पर्धेंत धडधाकट असणाऱ्या स्पर्धकांना मागे टाकत अवनीने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. बंदुकीची नेमबाजी हा खेळ तसा खर्चिक आहे. अवनी आत्तापर्यंत बंदुकी आणि लागणारं साहित्य हे दुसऱ्याचं वापरत होती. शालेय किंवा राज्यस्तरीय ज्युनिअर पातळीवर त्याने काम भागत होतं पण ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लागणाऱ्या  साहित्याचा खर्च महाग होता. २०२१ साली होणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या तयारीसाठी भारत सरकारच्या 'स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने Target Olympic Podium Scheme (TOPS) ची योजना काही वर्षं आधी आणली होती. अवनीने भारत सरकारकडे मदत मागितली. त्यानंतर अवनीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं साहित्य या योजनेखाली उपलब्ध करून देण्यात आलं. पण ही सुरूवात होती, तिला अनेक अडथळ्यांवर मात करायची होती. तिच्या मते, 


“I believe it is harder for us because we have to have mental strength. When you are a para-athlete, people start judging you. To live with a disability is a victory in itself.”


दिव्यांग म्हणून समाजाची बघण्याची मानसिकता वेगळी झालेली असते. स्वतःच्या आयुष्याशी झगडणाऱ्या त्या खेळाडूला खेळाशिवाय या अडथळ्यांवर मात करून आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध करायचं असतं. आज अवनी लेखराने त्या सगळ्या अडथळ्यांवर मात करत लक्ष्यभेद करताना आपलं नाव खेळाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरताना भारताची महिला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवण्याचा मान पटकावला आहे. तिचा हा प्रवास राखेतून उडी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखा आहे. जो अनेक भारतीय खेळाडूंना तर प्रेरणादायक आहेच पण आयुष्यात छोट्या छोट्या अपयशांनी खचून जाणाऱ्या प्रत्येकाला अपयशावर कश्या रीतीने मात करता येऊ शकते हे दाखवणारा आहे. 


अवनी लेखराचं तिच्या उत्तुंग यशासाठी खूप खूप अभिनंदन. आज प्रत्येक भारतीयाला मग तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू दे, तुझा अभिमान आहे. तुझ्या पुढील प्रवासासाठी सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. 


जय हिंद!!!


फोटो स्त्रोत :-  गुगल 

Sunday, 6 June 2021

*शिवराज्याभिषेक दिन*

  #शिवराज्याभिषेक_सोहळा 


राज्याभिषेक म्हणजे काय तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक.



‘आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे, आपलं एक तख्त आहे‘ याची गोरगरीब रयतेला चिरंजीव हमी देणारा तो सुवर्णक्षण म्हणजे राज्यभिषेक.


६ जून १६७४ रोजी झालेला तो शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे अखिल हिंदुस्थानच्या इतिहासातील सगळ्यात मोठा सोहळा.

इतिहासातील एक अजरामर असा दिवस.

परकीय सत्तांचे वरवंटे महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या छाताडावर थयथया नाचत असताना सतराव्या शतकात शिवनेरीवर जन्मलेला तो एक निखारा पुढील काही वर्षात विक्राळ रूप धारण करत जणू त्या परकीय यवनी सत्तांना त्याच्या अविरत तेजाने भस्मसात करतो अन कित्येक वर्षांचे असलेले गुलामगिरीचे जोखड भिरकावून देत अखिल मराठी मातीला जणू स्वाभिमानाचे, सार्वभौमत्व असलेले हक्काचे बत्तीस मण सुवर्ण सिंहासन उभे करत गोरगरीब रयतेला हक्काचे असे तख्त निर्माण करतो.

खरे तर ही घटना म्हणजे अवर्णनीय, अतुलनीय अशीच असावी.

ह्या घटनेची तुलना इतिहासातील किंवा वर्तनामनातील कोणत्याच घटनेशी होऊ शकत नाही ऐसी घटना होती ती.


छत्रपती शिवरायांच्या त्या राज्याभिषेकाच्या लक्षणीय घटनेमुळे परकीय सत्तेच्या दावणीला बांधली गेलेली ती मराठी अस्मिता जणू एकप्रकारे शहारली, थरारली, चवताळून उठली अन मावळ्यांमध्ये जागवल्या गेलेल्या याच अस्मितेच्या बळावर रायगडावर बत्तीस मणाचे सुवर्ण सिंहासन सिद्ध झाले. या या पृथ्वीवरून संपूर्ण म्लेंच्छांचा पाडाव करत अखिल हिंदूंसाठी त्यांच्या हक्काचे सार्वभौम सिंहासन उभे केले.


तस बघायला गेलं तर सतराव्या शतकात मोगल साम्राज्य म्हणजेच भारत सरकार असे समीकरण होते. अन तेच हिंदुस्थानी अन परकीय पण मान्य करत. यादवांच्या देवगिरीच्या साम्राज्यानंतर अखिल हिंदुस्थानात हिंदूंचे हक्काचे असे सिंहासन नव्हतेच. काबुल ते कंदहार पर्यंत पसरलेल्या बलाढ्य साम्राज्याचा सर्वेसर्वा तो कपटी औरंगजेब स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह म्हणवून घेत असे. भारताच्या कानाकोपऱ्यात म्हणजे दक्षिणेतील केरळ अन युरोपियन लोकांच्या किनाऱ्यावर असलेल्या वसाहती सोडता अखिल हिंदुस्थानात स्वातंत्र्य म्हणता येईल असे एकही राज्य नव्हते.

काही राजपूत राज्ये व गोवळकोंडा अन विजापूर ही स्वतंत्र राज्ये होती पण ती मुघलांचीच मांडलिक म्हणून होती अन यवन होती.

राजपूत राज्ये खालावत चालली होती. जणू तेही मुघलांचे मांडलिकच होते. ना कोणता निर्णय घेण्याची मुभा ना स्वतः काही करण्याचं स्वातंत्र्य.

तसेच हिंदुस्थानातील अनेक हिंदू सरदार, उत्तरेतील राजपूत वगैरे त्यांचीच चाकरी करत त्यांच्याशी रोटी-बेटीचे व्यवहार करत सत्तेची तहान भागवण्यात मशगुल होते.


“पुरे हिंदोस्तान के आलमगिर होना चाहते है हम” अशी त्या औरंगजेबची इच्छा असताना त्याच्याच छाताडावर पाय रोवत महाराजांनी रायगडी बत्तीस मण सोनेरी सिंहासन साकारत त्याच्या कपटी महत्त्वकांक्षेला जबरदस्त हादरे दिले अन गोरगरीब रयतेचे पालनहार म्हणून शिवाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज झाले.


राज्यभिषेक सोहळा कशासाठी??


खर तर शिवरायांनी १६७४ पर्यंत शत्रूंचे अनेक प्रदेश जिंकून घेतले होते. प्रजेसाठी त्यांचा अंमल होता. शत्रूवर वचक होती, सर्वजण सुखात नांदत होते, कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे पाळली जात होती, मग राज्यभिषेक करवून घेण्याची जरूर ती काय असावी??


आजवर स्वतःसाठी कोणतीच वैयक्तिक गोष्ट न करणाऱ्या माणसाला या राज्यभिषेकाची गरज ती का वाटली असावी?? ज्या माणसाने ना स्वतःसाठी कधी राजवाडा बांधला, ना कधी कोणती वास्तू उभी केली. मग राज्यभिषेक का??


ती एका व्यक्तीची महत्वकांक्षा होती का?? ती चंगळबाजी होती का?? तो पैशांची उधळपट्टी होती का??


तर नाही.


शिवरायांनी १६७४ पर्यंत स्वराज्याचा विस्तार खूप वाढवला होता तरीही तोपर्यंत शिवराय हे तांत्रिक दृष्ट्या मोगली मनसबदार होते. मोगलांची चाकरी बजावणारे मातब्बर मराठा सरदार तसेच विजापुरी बादशहा मोगलांना आदिलशहापेक्षा कमी लेखत. शिवरायांनी आपल्या कर्तबगारीने मनगटाच्या बळावर आपले जे स्थान निर्माण केले होते त्याला एक कायदेशीर स्वरूप देणे गरजेचे होते. राजेशाही स्थापन करण्याची जरूर होती. शिवरायांचा राज्यभिषेक झाला पाहिजे अशी सुप्त इच्छा प्रजेच्या सर्व वर्गात पसरली होती.


राज्यभिषेक एक कर्तव्य होतं. ती एक सार्वभौमत्वाची महापूजा होती. त्या सोहळ्याचा परिणाम वर्तमानातील अन भविष्यातील अनेक पिढ्यांवर होणार होता.

तो कोण्या एका व्यक्तीचा स्तुतीसोहळा नव्हता, ते होते सार्वभौमत्वाचे सामूहिक गौरवगाण.

या अगोदर असलेल्या सर्व हिंदू राज्यांच्या राजधान्यांवर स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी एक फुंकर या सोहळ्याने पडणार होती.

सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरी नदीच्या पैलतीरापावेतो म्हणजेच असेतु हिमाचल हा संपूर्ण देश स्वतंत्र, सार्वभौम अन बलशाली व्हावा हेच महाराजांनी बोलून दाखवले होते.


या सार्वजनिक भावनांना वाट करून देण्याचे काम थोर ब्राह्मण पंडित, वाराणशीचे विश्वेश्वर, वेदोनारायण गागाभट्ट यांनी केले.


या प्रसंगाबद्दल सभासद लिहतो-

“पुढे वेदमूर्ती गागाभट्ट म्हणून वाराणशीहुन राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास एके. भट गोसावी यांच्या मते मुसलमान पातशहा तक्ती बसून छत्र धरून, पातशाही करितात, आणि शिवाजीराजे यांनीही चार पादशाही दबविल्या. आणि पाऊण लाख घोडा लष्कर असे असता त्यांस तख्त नाही. या करिता मऱ्हाठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तांत आणिले. आणि ते राजीयांसही मानिले. अवघे मातब्बर लोक बोलावून आणून विचार करिता सर्वांचे मनास आलें तेव्हा भट गोसावी म्हणू लागले की तक्ती बसावें!”


“तक्तासी हाचि गड करावा” असे म्हणत राजांनी संमती दर्शवली.


“हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा।“


आता शिवरायांचा राज्यभिषेक होणार ही बातमी वाऱ्यासारखी रयतेत पसरली. रयत आनंदाने बेभान झाली. सगळीकडे घरातील उत्सव असल्यासारखे वातावरण निर्माण झाले.

पण तत्कालीन काळात आतासारखी परिस्थिती नव्हती.

एखादा निर्णय व्हायच्या आधीच  मीडिया सगळ्या देशभरात त्याचा गाजावाजा करेल.

दुर्गम भागात असलेली रयत अजूनही या बातमी पासून बेमालूम होती.

याचवेळी घडलेली एक गंमत म्हणजे कॉस्म-दी-गार्द नावाचा एक पोर्तुगीज कोकणातून गोव्याकडे निघाला होता. त्याला प्रवासात राजांच्या राज्यभिषेकाची वार्ता समजली. तो विश्रांतीसाठी एका खेड्यात थांबला. खेड्यातील काही माणसांची गर्दी त्याच्या सभोवताली जमली. एक गोरा फिरंगी, वेगळा मनुष्य हेच त्यांचे कुतूहल असावे. तो गार्द मोडक्या-तोडक्या भाषेत त्या लोकांना म्हणाला की ‘तुमचा शिवाजीराजा सिंहासनावर बसणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का?‘ त्या खेडुतांना ही बातमी प्रथमच समजत होती.

त्यांना त्या मोडक्या भाषेतील आपला राजा आता सिंहासनावर बसणार एवढं नक्कीच उमगलं. अन ती माणसं विलक्षण आनंदली. ही घटना म्हणजे मराठी मनाचा कानोसा घेणारी सुचकताच जणू. सर्वसामान्य गोरगरीब लोकांना सुद्धा राज्यभिषेकाचा तो आनंद जाणवला होता. यालाच आपण शिवरायांनी जागृत केलेला स्वाभिमान अन राष्ट्रभक्ती म्हणू शकतो.


राज्यभिषेकाचा मुहूर्त ठरला…

शालिवाहन शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सर म्हणजेच ६ जून १६७४ रोजी महाराज सिंहासनावर बसणार होते.


राज्यभिषेकाची तारीख ६ जूनच का??


शिवरायांचा राज्यभिषेक होणार ही खबर अखंड हिंदोस्तानात वाऱ्यासारखी पसरली.

आता ती औरंगजेब अन बाकीच्या शत्रुलाही मिळाली असणारच. त्यामुळे औरंगजेब राज्याभिषेक सोहळ्यात आडकाठी घालण्याचा नक्की प्रयत्न करणार हे महाराजांना ठाऊक होते.

६ जून ही तारीख निवडण्याचं कारण म्हणजे ७ जूनला आपल्याकडे मृग नक्षत्र चालू होतं.

रायगडावर रवरवत्या पावसाच्या सरी अशा कोसळतात की राज्यभिषेक रोखायला आलेला शत्रू गडाच्या जवळ येईल खरा पण परत काय जाईल…

सह्याद्रीच्या त्या दुर्गम घाटवाटा अन पावसाळ्यातील ते निसरडे रस्ते व डोंगरदऱ्या लांघणे म्हणजे शत्रूसाठी केवळ अशक्य गोष्ट.

त्यामुळे आपल्या रयतेला काही त्रास होऊ नये अन रयत आनंदाने या सोहळ्यात सहभागी व्हावी व शत्रूला सुद्धा या सोहळ्यात कोणते विघ्न आणता येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक निवडलेली ती तारीख होती.


राज्यभिषेक सोहळ्याची तयारी..


राज्यभिषेक सोहळ्याची तयारी जवळपास वर्षभर आधीपासूनच सुरू झाली होती.

त्याच काळात निश्चलपुरी गोसावी म्हणून एक अध्यात्मयोगी सत्पुरुष रायगडी आले.

राज्यभिषेक सोहळ्याची तयारी अन त्यांच्या रायगडी असलेल्या काळात घडलेल्या घटना त्यांनी ‘राज्याभिषेक कल्पतरू’ या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत.


पावसाळा तोंडावर आलेला अन रायगड सजू लागला होता.

पाचाडच्या वाड्यात गर्दी वाढू लागली.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अगदी नियोजनबद्ध रीतीने सुरू होती.


राज्याभिषेक कशा पद्धतीने करायचा याबाबत राजसंस्कार सांगणारा एक संस्कृत ग्रंथ वेदोभास्कर गागाभट्ट यांनी लिहला होता तो म्हणजे ‘राजभिषेक प्रयोग‘. त्या ग्रंथात कोणता विधी कधी व कसा करायचा याबद्दलचा सगळा तपशील दिला आहे.


शिवरायांनी तख्तासाठी लागणारे बत्तीस मण सुवर्ण सिंहासन तयार करण्याचे काम पोलादपूरच्या रामजी दत्तो चित्रे या अत्यंत विश्वासू जामदाराकडे १६७३-१६७४ च्या दरम्यान सोपवले होते. जामदार म्हणजे सोने चांदी अन जडजवाहीर सांभाळणारा अधिकारी. त्या सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अन अगणित नवरत्ने जडवून अनेक सांस्कृतिक शुभचिन्हे कोरायची होती.


६ मार्च १६७४ रोजी शिवराय चिपळूण येथे असलेल्या स्वराज्याच्या छावणीला भेट देऊन परत रायगडावर आले. दरम्यानच्या काळात हंबीरराव मोहिते याना हंबीरी देऊन रिक्त असलेले सरसेनापती हे पद त्यांना बहाल करण्यात आले.


१८ मार्च १६७४ रोजी शिवरायांच्या धर्मपत्नी काशीबाईसाहेब यांना स्वर्गवास झाला.


१९ मे १६७४ रोजी शिवरायांनी प्रतापगडाला भेट देऊन कुलस्वामिनी आई भवानीचे दर्शन घेतले. त्यावेळी राजांनी देवीला सोन्याचे छत्र अर्पण केले. त्या छत्राचे वजन ३ मण एवढे होते अन त्याची किंमत त्याकाळात ५६ हजार रुपये एवढी होती.


शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते. दरम्यानच्या काळातील राजकीय घालमेलीमुळे क्षत्रियांनी पाळायचे संस्कार लुप्त झाले होते, त्यामुळे प्रथम उपनयनाचा संस्कार करण्याची आवश्यकता होती. भोसले हे सिसोदिया वंशातील क्षत्रिय आहेत हे सिद्ध केले.


मग ज्येष्ठ शु. चतुर्थीला, घाटी ५, आनंदनाम संवत्सर शके १५९६ म्हणजे २९ मे १६७४ रोजी राजांची समंत्रक मुंज झाली. त्यावेळी राजांचे वय होते ४४ वर्ष. त्यानंतर पुण्याहवाचन, होम हवन इत्यादी विधी झाले.


२९ मे रोजी प्रथम एक उंबराचे लाकूड कोरून, त्यात तूप घालून त्यायोगे त्यांचा पुनर्जन्मसंस्कार करण्यात आला अन त्यांना समारंभपूर्वक क्षत्रिय करण्यात आले.


त्यानंतर ३० मे रोजी ज्येष्ठ शु ६, शनिवारी महाराजांचा आपल्या पत्नी सोयराबाई यांच्याशी दुसऱ्यांदा विवाह समारंभ करण्यात आला.


त्यानंतर महाराजांचे सोन्या-नाण्याने तुलादान झाले. त्यावेळी राजांचे वजन १६००० होन झाले अन रक्कम ६० हजार पागोडा इतकी भरली. त्यात एक लक्ष होनांची भर घालून ते राज्यभिषेकादिवशी जमणा-या ब्राह्मणांना दान करावयाचे त्यांनी ठरवले.

हे सर्व विधी २९ अन ३० मे यादिवशी झाले.


त्यानंतर ३१ मे, ज्येष्ठ शु. सप्तमी, रविवारी महाराजांनी इंद्रियांच्या शांतीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञासाठी उपस्थित ब्राह्मणांना सुवर्ण होन दक्षिणा म्हणून देण्यात आले.


१ जून, ज्येष्ठ शु. अष्टमी, म्हणजेच सोमवारी इंद्रिय शांतीच्या विधीचा राहिलेला भाग पूर्ण करण्यात आला.


२ जून, ज्येष्ठ शु. नवमी रोजी मंगळवारी कोणताच धार्मिक विधी किंवा पूजा केली नाही.


३ जून, ज्येष्ठ शुद्ध दशमी, बुधवारी इंद्रिय शांतीच्या विधीचे उत्तरपूजन करण्यात आले.


४ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध एकादशी चा पवित्र दिवस.

या दिवशी निऋतियाग: हा एक वेगळ्या प्रकारचा विधी करण्यात आला.


दिवस उजाडला होता ५ जून १६७४.


रायगड तर जणू हर्षाने उल्हसित झाला होता.

नगारखाना सजला होता, मनोरे फुलांनी सजले होते.

पाहुण्यालोकांसाठी राहुट्या, मंडप सजलेले.

नौबती झडत होत्या. गंगासागर तुडुंब भरलेला होता, कुशावर्तात सुद्धा भरपूर पाणी होते.

नगारखान्याचा तो भव्य असा दरवाजा अंबारीतून भगवा ध्वज असलेला हत्ती सहज आत जाऊ शकेल असा तो दरवाजा. भगवा डौलाने फडकत होता. रायगडाचा प्रत्येक चिरा अन बुरुज जणू आनंदाने नाचत होता. त्या सुवर्ण सोहळ्यासाठी आतुर झाला होता. महादरवाजपाशी मावळे उभे होते.

रायगड सगळे बघत होता, डोळे भरून, कडा न कडा, दगड, माती, झाडेझुडपे, हरखून गेली होती.

सगळ्यांच्या मनात स्वातंत्र्याचे हुंकार उठत होते. नगारखाना तर जणू स्वतःलाच विसरला असेल.

जणू राजांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला,

माझा धनी येणार, माझा राजा येणार.

ते बत्तीस मण मराठी दौलतीचे सोनेरी सिंहासन आपल्या धन्याच्या स्पर्शासाठी व्याकुळ झाले होते.

त्यावेळी हेन्री ओक्सेंडन नावाचा इंग्रज वकील रायगडावर हजर होता.

त्यादिवशी निराजीपंतांनी त्याला सांगितले की उद्या सिंहासनारोहण होईल अन दरबार भरेल. त्यावेळी शिवाजी राजांना मुजरा करण्यास व नजराणा अर्पण करण्यास तुला जावयाला हवे.


अन ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो सुवर्णदिन उजाडला.

त्यावेळी रायगडावर काय लगबग असेल ती शब्दांत मांडताच येत नाही.


या सुवर्णक्षणाचे वर्णन करताना सभासद लिहतो-

‘तक्त सुवर्णाचे बत्तीस मणाचे सिद्ध करविले. नवरत्ने अमोलिक रत्ने तक्तास जडाव केली. सप्त महानदियाची उदके व थोर थोर नदीयांची उदके व समुद्राची तीर्थक्षेत्र नामांकित, तेथील तिर्थोदकें आणिली. सुवर्णाचे कलश अन तांबे केले. आठ कलश अन आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियास अभिषेक करावा असा निश्चय करून सुदिन पाहून मुहूर्त पाहिला…

सिंहासनावर बसले. सिंहसनास अष्ट खांब जडीत केले. त्या पद्धतीप्रमाणे शास्त्रोक्त सर्वाही साहित्य सिद्ध केले. संपूर्ण खर्चाची संख्या एक क्रोड बेचाळीस लक्ष होन जालें. अष्टप्रधानास लक्ष लक्ष होन बक्षीस दर आसामीस त्याखेरीज एक हत्ती, एक घोडा, वस्त्रे, अलंकार असे देणे दिले. येणेप्रमाणे सिंहासनारूढ जालें. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.“

राज्यभिषेक सोहळ्याचे विधी ५ जून १६७४ रोजी म्हणजेच आदल्या रात्रीच सुरू झाले होते. ते विधी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच ६ जून १६७४ च्या सकाळपर्यंत चालू होते.

आदल्या दिवशी म्हणजे ५ जूनला विविध कलशात सप्त नद्या अन सागरातून आणलेल्या पवित्र जलाची पूजा करण्यात आली. अन त्यानंतर बालेकिल्ल्याशेजारी असलेल्या तलावात त्यातील पाणी टाकण्यात आले त्यामुळे त्या तलावाला गंगासागर हे नाव प्राप्त झाले.

रात्री अग्निदेवतेची पूजा झाल्यानंतर राजांना दुसऱ्या खोलीत नेण्यात आले व तिथे त्यांना पवित्र जलाने स्नान घालण्यात आले. त्यानंतर त्यांना चंदनाची भुकटी अन सुगंधी तेलाने अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाराजांनी सफेद वस्त्रे परिधान केली व त्यांना पुन्हा एकदा पंचामृताने अभिषेक घालण्यात आला.

अन त्यानंतर पुन्हा चंदन मिश्रित कोमट पाण्याने अभिषेक करण्यात आला.

पंचामृताने तीनवेळा अभिषेक करण्यात आला.

त्यानंतर महाराज आपली वस्त्रे परिधान करून दरबारात आले.


त्याप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा दिवस उजाडता शनिवारी  ३ घटका रात्र उरली असता भल्या पहाटे हा राज्यभिषेकाचा पवित्र विधी सुरू झाला.


मुस्लिम कालगणनेनुसार १० रबीलवल, खमस सबैन आलफ हा दिवस होता.


त्यांच्या मस्तकावर छत्र धरण्यात आले. राजांनी उंची वस्त्रे व अलंकार धारण केले होते. कुलपुरोहित बाळभट्ट यांनी त्याप्रसंगी राजांकडून महत्वाची धार्मिक कृत्ये करवून घेतली. सभोवताली अष्टप्रधान यांनी आपापल्या चिन्हानी व्यक्त होऊन ते देखील आसनावर विराजमान झाले. आसमंतभागी कोशशालांचे अधिकारी व सेनाधिकारी वगैरे नियुक्त स्थळी उभे जाहले.


महाराज सिंहासनाला वाकून नमस्कार करून सिंहसनाकडे जाणाऱ्या पहिल्या पायरीवर पाय ठेवणार त्याच वेळी त्यांना त्यांच्या सोबत्यांची आठवण झाली.


पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली “राजं उभा जलम शिवा काशीद म्हणून जगलो, पर मरताना शिवाजी राजा म्हणून मरील, यापेक्षा दुसरं भाग्य काय असणार तव्हा माज्यासाठी”. राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले.


राजांनी दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली ” राजे तुम्ही सुखरूप विशाळगडावर जावा आणि तिथं पोहचताच तोफांचे बार काढा. जोपर्यंत हे पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे.” राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला…


तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली “राजे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून माघारी आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका.” राजे ढसाढसा रडू लागले.


राजांना जणू आपल्या धारातीर्थी पडलेल्या एकेका मावळ्यांच्या बलिदानाची आठवण त्यावेळी झाली.


अन सिंहसनाजवळ जाऊन सिंहासनाला पदस्पर्श न करता

महाराज सिंहासनावर विराजमान झाले.

महाराज सिंहासनावर विराजमान झाले.

महाराज सिंहासनावर विराजमान झाले.


तारीख ६ जून ला पहाटे ५ च्या सुमारास शिवराय सिंहासनावर आरूढ झाले. तेव्हा जमलेल्या सर्व लोकांनी त्यांना शिवराय हे नामाभिधान दिले.

त्यानंतर स्वराज्याचे पेशवे मोरोपंत यांनी राजांना मुजरा करून आठ हजार होन राजांच्या शिरावर ओतले. निळो पंत यांनी सात हजार होन अन आणखी दोघा पंतांनी पाच-पाच हजार होनांनी राजांना सुवर्णस्नान करवले. राहिलेल्या प्रधानांनी राजांना मुजरे केले व सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना रांगा करून ते उभे राहिले. राज्यरोहण व सुवर्णस्नानापूर्वी ५ जूनच्या उत्तररात्री गंगोदकाने स्नान करून राजांनी प्रत्येक ब्राह्मणाला १०० होन एवढी दक्षिणा दिली. याप्रसंगी दक्षिणेच्या रुपात शिवरायांनी दोन लक्ष होन वाटले.


सभासद म्हणतो-


पूर्वी जसे कर्तायुगात, त्रेतायुगात अन द्वापारी राजे झाले तसेच कलियुगात पुण्यश्लोक शिवाजीराजे सिंहासनावर बसले. म्हणजे त्या प्रसंगाची तुलना सभासद जणू पौराणिक काळातील प्रभू श्रीराम अन भगवान गोपाळ कृष्णाच्या काळातील त्या घटनांशी करतो.

यावरून हा प्रसंग किती मोठा अन महत्वाचा असेल हे आपल्या लक्षात येते.


छत्रपती शिवाजी महाराज की जय अन हर हर महादेव या गर्जनांनी गडाचा परिसर दुमदुमून गेला.

सगळीकडे आनंदीआनंद होता, मावळे हर्षात नाचत होते.


अष्टप्रधानांनी आठ तांबे अन कलश घेऊन राजांवर अभिषेक केला. त्या मंत्र्यांचा तपशील अन पदे अशी होती..


मोरोपंत त्र्यंबक पिंगळे–  पेशवे , मुख्य प्रधान, पंतप्रधान.

रामचंद्र बावडेकर(नारो नीळकंठ)– मुजुमदार, पंत अमात्य.

अण्णाजी दत्तो प्रभुनिकर– सुरनीस, पंत सचिव.

दत्ताजीपंत त्रिंबक वाकनीस– वाकनीस, मंत्री.

हंबीरराव मोहिते- सरनोबत, सेनापती.

जनार्दनपंत हणमंते(त्रिंबकजी सोनदेव)– डबीर, सुमंत.

निराजी रावजी- न्यायाधीश, न्यायाधीश.

रघुनाथपंत(रायाजीराव)- न्यायशास्त्री, पंडितराव.


ब्रिटिश वकील हेन्री ओक्सेंडन याने त्यावेळी केलेले वर्णन सुद्धा तितकेच रोचक आहे.


हेन्री लिहतो-


“मी ६ जूनला सकाळी ७-८ वाजता दरबारात गेलो.

राजा एका भव्य सिंहासनावर बसला होता. उत्तमोत्तम वस्त्रालंकार परिधान केलेले सरदार त्याच्यासमोर उभे होते. राजाचा मुलगा संभाजीराजा, पेशवा मोरोपंडित अन मोठा प्रतिष्ठित असा ब्राह्मण सिंहासनाच्या पायथ्याशी बैठकीवर बसले होते. इतर मंडळी अन सैन्याधिकारी मोठ्या आदराने उभे होते. मी काही अंतरावरून मुजरा केला. शिवाजी राजाला देण्यासाठी आम्ही हिऱ्याची अंगठी आणलेली. ती नारायण शेणवी याने वर धरली.

सिंहासनाच्या दोन्ही बाजूला, सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार-निदर्शक व राजसत्तेची द्योतक चिन्हे मी पाहिली. उजव्या हाताला दोन मोठी, मोठ्या दाताच्या मत्स्याची सुवर्णाची शिरे होती.डाव्या हातास अनेक अश्वपुच्छे व एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर, समपातळीत लोम्बणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.

राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आम्ही परत आलो, तो दोन लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला झुलत होते.दोन देखणे(पांढरे) अश्व शृंगारलेल्या स्थितीत तेथे आणलेले दिसले.

गडाचा मार्ग इतका बिकट की हे प्राणी वर कोठून आणले असावेत याचा तर्कच आम्हास करवेना.”


राजाभिषेकानंतर महाराज सिंहासनावरून उतरले आणि हत्तीवरील अंबारीत बसले. राजांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. तिथून महाराज रयतेस दर्शन देण्यासाठी बाहेर पडले आजूबाजूला सेनापती, अंगरक्षक होते. एका अंबारीत जरी पताका आणि दुसऱ्या अंबारीत भगवा ध्वज घेऊन त्या महाराजांच्या बाजूने निघाले. लोकांची घरे जणू दिवाळीचा सण असल्यासारखी सजवली होती. महाराजांना तिथे उपस्थित असलेल्या सुवासिनींनी ओवाळले आणि पुष्पवृष्टी झाली, दुर्वा, कुरमुरेंचा, लाह्या इत्यादींचा वर्षाव केला आणि रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराचे दर्शन घेतले.


शिवराय नुसते छत्रपती नाही झाले तर त्यांनी त्यावेळी अनेक नवीन पद्धती अंमलात आणल्या.

त्यांनी कागदोपत्री शिवराजभिषेक शक सुरू केले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मराठी राजभाषा कोष सुरू केला, टांकसाळ सुरू करून स्वतःची नाणी चलनात आणली होन अन शिवराई ही नाणी पाडली.

एका नव्या युगाची जणू सुरुवात त्यादिवशी झाली होती.


त्या दिवशी महाराज छत्रपती झाले अन पोरक्या रयतेला त्यांचा वाली मिळाला. या अभागी धरणीला तिचा पती मिळाला. या हिंदवी स्वराज्याला त्याचा अभिषिक्त राजा मिळाला. काय दिवस असेल तो.

शिवराय छत्रपती होताच रायगडावर तोफेचे बार काढण्यात आले, शिंग वाजल गेलं.

त्यावेळी फक्त रायगडावरच तोफा डागल्या नाहीत तर एकाच वेळी स्वराज्यातील प्रत्येक गडावर तोफा डागल्या गेल्या.

आणि जणू त्या तोफांच्या कडकडाटाच्या आवाजाने औरंगजेबाचे कान बधिर झाले असतील, त्याच्या जुलमी महत्त्वाकांक्षेला असंख्य हादरे देणारा असा तो क्षण होता.

काय वाटलं असेल त्यावेळी जिजाऊ मासाहेबांना…

लहानपणी आपल्या मावळातील सवंगड्यांना सोबतीला मातीचे किल्ले बनवून मी रयतेचा राजा आहे असे सांगत स्वराज्याचा खेळ खेळणारा तो बाळ शिवाजी आज छत्रपती झाला.

जणू त्या राजांना म्हटल्या असतील की “माझ्या बाळाने माझं वचन पूर्ण केलं, माझा शिवबा राजा झाला.” अस म्हणत डोळ्यातून आनंदाची आसव ढाळू लागल्या.


अन शिवराय छत्रपती झाले ही खबर जेव्हा औरंगजेबाला समजली तेव्हा तोही उद्गारला-


‘या खुदा, अब तो हद हो गयी।

तू भी उस सिवा के साथ हो गया।

सिवा छत्रपती हो गया।’


ही घटना म्हणजे अखिल भारत वर्षाला चिरंतन काळासाठी प्रेरणा देणाऱ्या एका सोनेरी पर्वाची ती एक नांदी होती, जी सर्वसामान्य रयतेच्या मनामध्ये चिरंतन काळासाठी कोरली गेली.राज्याभिषेक म्हणजे काय तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक.


या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही……


किरण नरसाळे

Friday, 19 February 2021

श्री छत्रपती शिवाजी महाराज

 *आज*


*१९ फेब्रुवारी*



*युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती*


छत्रपति शिवाजी महाराज 

(१९ फेब्रुबारी १६३० – ३ एप्रिल १६८०).

महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी ⇨शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर तालुका – पुणे जिल्हा) झाला. त्यांच्या जन्म-तिथीविषयी एकमत नाही. मराठी बखरींच्या आधारावरून त्यांचा जन्म १६२७ मध्ये झाला; पण जेधे शकावली, कवींद्र परमानंद याचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका, या विश्वसनीय साधनांवरून फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे.

शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते, अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे, असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व देऱ्हाडी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीच्या दरबारातील खंडागळेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखूजी जाधव यांच्यात वितुष्ट आले, ते पुढे कायम राहिले. शहाजींनी १६२० पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाहीविरुध्द लढण्यास सुरुवात केली होती; पण १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही त्यांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले; पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्युनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले.


निजामशाहीतील दरबारी कारस्थानात शहाजींचे सासरे लखूजी जाधव मारले गेले (१६२९). त्यामुळे नाराज होऊन त्यांनी निजामशाहीची नोकरी सोडली. त्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांचा विवाह शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव यांच्या मुलीशी झाला होता. त्या निमित्ताने शहाजींनी जिजाबाईस शिवनेरीवर ठेवले होते. विजापूर सोडून गेल्यामुळे मुहंमद आदिलशहा (कार. १६२७–५६) हा शहाजींवर रुष्ट झाला होता. आदिलशाही विरुध्द गेलेली आणि लखुजींच्या मृत्युमुळे निजामशाही सुटलेली अशा अवस्थेत शहाजींना परागंदा होण्याची वेळ आली. अखेर आदिलशहाच्या बोलावण्यावरून ते १६३६ मध्ये त्याच्या नोकरीत शिरले. आदिलशहाने त्यांच्याकडे पुण्याची जहागीर बहाल केली व मोठा हुद्दा देऊन कर्नाटकाच्या मोहिमेवर पाठविले. विजापूरच्या सैन्याने १६३८ च्या अखेरीस बंगलोर काबीज केले. तेव्हा बंगलोर, कोलार इ. प्रदेशांची जहागीर शहाजींना मिळाली आणि ते बंगलोर येथे कायमचे राहू लागले

छत्रपती शिवाजी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले बेत उत्तम रीत्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरविले. कोणत्याही मोहिमेस वा कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेस पटेल तेच स्वीकारत. सर्व कार्यात त्यांनी सर्व जातींतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती ती कामे करवून घेतली.


पतितपरावर्तन हा मार्गही त्यांनी अवलंबिला. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे सुंता झालेले आणि मुसलमानांत दहापाच वर्षे राहिलेले मराठे सरदार त्यांनी परत हिंदू करविले व त्यांच्या कुटुंबियांशी सोयरीक केली. तसेच सर्व धर्मांतील साधु-संतांना सन्मानाने वागविले आणि त्यांना उदार अंतःकरणाने देणग्या दिल्या. मुंबई–लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात (१६ जानेवारी व १४ फेब्रुवारी १६७८) अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूर वीरांबरोबर शिवाजी महराजांची तुलना करण्यात आली आहे. मार्तिन या प्रवाशाने आपल्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या धूर्तपणाबद्दल कौतुक केले आहे.


खाफीखान हा औरंगजेबाचा तत्कालीन इतिवृत्तकार. तो शिवाजी महाराजांचा कट्टर द्वेष्टा होता; पण तोही शिवछत्रपतींविषयी म्हणतो, ‘शिवाजीने सार्वकाल स्वराज्यातील प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला. लज्जास्पद कृत्यापासून तो सदैव अलिप्त राहिला. मुसलमान स्त्रियांच्या अब्रूला तो दक्षपणे जपत असे. मुसलमान मुलांचेही त्याने रक्षण केले. या बाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत.


जो कोणी या बाबतीत आज्ञाभंग करील, त्याला तो कडक शासन करीत असे.’ महाराष्ट्रेतर कवींनी–विशेषतः तमीळ (सुब्रह्मण्य भारती), तेलुगू (कोमाराजू वेंकटलक्ष्मणराव), बंगाली (रवींद्रनाथ टागोर), गुजराती (झवेरचंद मेघाणी) हिंदी (केदारनाथ मिश्र) इत्यादींनी महाराजांना गौरविले आहे. स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्ज्वल्य अभिमान यांमुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली. त्यांचे जीवन भारतीय राष्ट्रीयत्वाचा आविष्कार होय. त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील, अशी व्यवस्था केली. धैर्य आणि साहस यांबरोबरच अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. म्हणून समर्थ रामदास म्हणतात –


निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु


अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी.


दक्ष प्रजापालन, न्याय्य करव्यवस्था, सैन्याने रयतेला त्रास न देणे, या व अशा अनेक यशस्वी धोरणांमुळे महाराजांच्या मृत्यूनंतरही मोगल साम्राज्याचे कंबरडे मोडेपर्यंत मराठे लढले आणि पुढे भारतव्यापी झाले. मराठी मनाला ही प्रेरणा-ज्योत आजपर्यंत पुरली आहे व पुढेही पुरेल यांत शंका नाही.

महाराजांना विनम्र अभिवादन..!

संकलन,शब्दांकन 



Thursday, 18 February 2021

Shri Chatrapati Maharaj

 *CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ IN NEW YORK....*




      *By : Kiran Narsale*


      I see you are little confused with the above line; Yes,I am sure you are.  Chhatrapati Shivaji Maharaj, a legendary figure who inspired millions across the country and worldwide by his sheer grit and spirit, a noble king who lived for people, founded in the sublimal idea of Swarajya and denied to bow down to slavery yet went to establish his kingdom from here to Jini , in the far corner of down South.

      Wait before you announce that ' I have read it all ' post, as I am going to provide something that makes this Legendary figure as a Noble king, savior of deprived, a staunch supporter of Freedom to all and greatest Military General, along with synonyms for extraordinary ,Shivaji Maharaj is undoubtedly one of the finest specimen of Management Guru who instilled in us hoardes of rules for ideal governance.

      So let me give you some vital management tips of Chhatrapati Shivaji Maharaj...

      Leadership: Lead from Front.

      The famous battles at Pratapgadh with ferocious Afzal Khan and his commando raids at Lal Mahal ( better call it ' Surgical Strike ') to push out Shahista Khan from Pune are few examples of leading from front ; 

      though we all are aware of the fact that Shivaji Maharaj has his imposter Hiroji Farzand( who replaced him in Agra escape). He preferred to face the battlefield rather than giving orders from his fortress, enjoying luxury of food, wine and music, like most of his foes would do.

      He is defined by Historian Yadunath Sarkar as'  a mere presence of Shivaji Maharaj on the battlefield was like Cavalry regiment of 50000 ' , as same goes with Napoleon Bonaparte. They have few things in common. Both fought from the front and with mammoth enemy forces in comparison with theirs, still claimed glorious victories over.

      Flawless Planning and Execution.

      Agra escape is the most pre-eminent   precedent of his political acumen and absolutely flawless Planning.

      Here I would like to put up that before he escaped out of Agra and clutches of dreaded Mogul Aurangzeb , he made it sure that all his men went out safely. His Guerrilla tactics were extremely successful and his colossal knowledge of demographic information about formidable Sahyadri mountains made life miserable for his enemies. Point to mention that even after his untimely death and assassination of Sambhaji Maharaj by Aurangzeb, with no king , no throne and no guidance, still Marathas went to fight Moguls for 18 years;

       all because of Sahyadri mountains aka General Famine and General Winter of famous German-Russia war.


Power comes with authority.

His 8 Council of ministers were extremely competent and got virtuous amount of powers to run the government. Just look at Shri. Moropant Pingle, who would draw sum of 40 lacs( according to present salary) for his contribution. Retention was inevitable ; just look at the comaredes of his: 


Tanaji to Baji Prabh every single soldier would die for the cause ; when you are working for a King who would personally take care of the deceased family made them to offer their lives in the line of duty.


SWOT analysis:


After his arrest at Agra he was left with only 17 forts, as the rest were surrendered before the Moghuls, but after his return to his capital, within next 10 years his count of the forts were 260. 

It demonstrate  us, he must have done SWOT analysis to determine how he can get back to lead and manage to get back everything possible.

 He was so farsighted that he shifted the Capital city to Raigad after the seige by Raja Jaysingh.


Ideal Idea of Swarajya: 

A state where no discrimination on the basis of caste, gender, colour religion and politics , his entire staff was selected purely on the basis of qualifications and skills, obviously no place for ' अपने गाव का है, अपने जात का है...'  his belief in his men was such that his personal staff consisted of many Afghans, Moghuls and others. His raid on Afzal Khan was  a party of 10 Elite Commandos,  including one  Afghan named Sidhi Ibrahim Khan. He knew that though he belongs to different race, still he had kept immense amount of faith in his each one.

The training of his army was superior then his enemies and the instance of Pratapgadh battle were all 10 men of his survived where as Afzal Khan and his men were killed in the combat, it proves the combat skills. 

Abilities have nothing to do with oppertunities: 

Without any background nor support Shivaji Maharaj went on to create a magnificent kingdom where everything was conducted by the rule of law and order. No enemy land was destroyed so no damages done for crops, cattles.

 Women and children were always left unharmed. Look into the cases of Ranjya , a small town and famous Kalyan' s beautiful daughter in law.

 Not a single reference where his army would do anarchy and would be left without punishment. He was known to punish his own men for misconduct with women. For welfare of farmers he had we loans for them. His army was receiving salary regularly and that was the one reason of retention

 . He was so  righteous with understanding pyschology that he played with his enemies over and got them defeated. But he never went cynical about them. After the killing of Afzal Khan, his dead body was laid down with protocol and respect. 


Reformation of society:

First to compile 1200 words dictionary for users, made specimen of around 80 types of business and Official letters, so his administration can run smoothly. Would disguise and mingle around with commoners to know about his rule. It is documented that everyday he would go to his stable and pray for the wellbeing of his horses with a shlokas. 300 miles of cost line and 300 ship yards made his navy formidable. 


Blueprint for ideal governance: 

His intelligence were way beyond his enemies and that gave him advantages at many times. When he went to Surat, he had a complete blueprint for each one of the richest people and where to find out the valuable. 


Media Baron: Publicity Campaign

Somalian Pirates were the headache for merchants visiting Deccan plateau. Once his navy captured few Somalian Pirates, they were punished with extreme severity. One meal and 12 hours of hard work. When left after two years of hardships, these Somalians went back to every port warning others to avoid troubling Merchants Deccan region. 

For development of Society he paved way for spiritual growth through Sant Tukaram and Ramdas Swami. His mission and vision statement is attached with the emblem of Swarajya.


Still wondering about Shivaji Maharaj and New York...

On the fringe of New York City area there lies in the elite Defence Academy at West Point. West point defence academy , known for producing great American Generals with a long history from General Patton, MacArthur and many more. This Academy gives training of strategic planning in warfare, tactics and execution .

To explain their elite members they have made Sand Models of classic battles. Out of several, two are significant to put here.

1) Model of Pratapgadh battle of Shivaji Maharaj and Afzal Khan.

 2) Bajirao and Nizam Ul Mulk at Palkhed.


So now I hope you are free from the state of confusion about the title. 

The time has come to see the Great King Shivaji Maharaj makes his way into IIM, DRDO and all the streams of education and eventually making it into the lives of every Indian.


JAI BHAVANI, JAI SHIVAJI, JAI BHARAT!!!



Narsale Kiran

Wednesday, 8 April 2020

कधीही न चुकलेली चैती पाड्याची यात्रा

    

 🌹कधीही न चुकलेली  चैती पाड्याची यात्रा🌹


                *💐एक अविस्मरणीय आनंद सोहळा💐*

 आज हा लेख मुद्दाम लिहायला घेतला आणि सरकन भूतकाळ डोळ्यासमोर आला. ३५० वर्षापूर्वीची आषाढी वारीची परंपरा ज्याप्रमाणे आजतागायत रुढ आहे. *पंढरीचा वारकरी! वारी चुको न दे हरी!!* अशी मागणी ज्याप्रमाणे वारकरी पंढरीच्या पांडुरंगाला करतो.अगदी तशीच मागणी दरवर्षी आपले नांदुरकर   ग्रामस्थ  श्री निंबा दैत्य महाराज  चरणी करतात. श्री दैत्य बाबा आमचीही चैत्री यात्रा कधीच चुकू देऊ नकोस.आणि खरोखरच माझी आतापर्यंत एकही चैत्री यात्रा चुकलेली नव्हती.अगदी परीक्षा काळातही.कधी यात्रा चुकवली नाही.आज अतिशय जड अंतकरणाने आजच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे.आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी शरीराने जरी घरात आसलो तरी मनाने मात्र श्री दैत्य बाबाच्या प्रांगणात आहोत.गेल्या पंचवीस वर्षातील चैत्री  पाडा यात्रा अनुभवली .यात्रेच्या अगोदर महिनाभर ही तयारी सुरु व्हायची.आम्ही खूप लहान होतो नवीन कपडे आणायला  खरवंडी  (फार पूर्वी तोंडोळी)कापड दुकानात दैत्य नांदूर कर गर्दी करायचे .मांजरपाट ,हरक, क्वचित टेरिकाॕट असे कापड  घेतल्यावर  दुकानाशेजारी  टेलरिंगचे दुकान असायचे तिथे सर्व जण कपडे शिवायला टाकायचे. यात्रेच्या आधी एक दिवस कपडे शिऊन मिळायचे. जयंतीचे भजन.कोणी कोणी आदल्याच दिवशी श्री संत एकनाथ महाराजांचे पैठण येथे कावडी आणण्यासाठी जायचे . तर काही जण पहाटेच काशिकेदार येथे  जाऊन खोलवर आसलेलं पाणी शेंदायचे आणि किमान यात्रेच्या दिवशी प्रत्येक जण पाच ते सहा कावडी आणायचाच.पुरती दमछाक व्हायची.पण यात्रेचा उत्साहात शीणभाग कुठल्या कुठे पळून जायचा.सर्व देवाना नारळ फोडण्यात आणि नैवद्य (तेव्हाच्या भाषेत निवाद )  घेऊन जाण्यात एक वेगळा आनंद सकाळी ७.००च्या आत.नवीन कपडे घालुन चौकातील गणपती मंदिरात हजर.मग दैत्य बाबाच दर्शन घेतल्यानंतरचा आनंद अवर्णनीय.दोन रूपयाचा प्लॕस्टिकचा  लाल चष्मा आणि एक रुपयाचे मनगटी घड्याळ घेतलं की गाडी खूष व्हायची .या वस्तूसाठी खेळणीची दुकाने पूर्वी नव्हती . बाहेरगावतील  पाहुणे तसेच गावातील बाहेरगावी असलेले सर्व नोकरदार  मंडळी तसेच गावातील सर्व  सासरला असलेल्या लेकी   आणण्यासाठी किंवा मुराळकी आणण्यासाठी गाड्या (पूर्वी बैल गाड्या )जायच्या.अनेक जण  येण्याची कसलीच सोय नसल्यामुळे भर उन्हात पायी पायी येणारांची तारांबळ होतअसे.

 श्री दैत्य बाबाचरणी असणा-या श्रध्देमुळे भाविकांना कसलाच त्रास होत नसे.  सकाळी कवडी व  त्यांची मिरवणूक अतिशय उत्साहात व आनंदात. होत होती.
गावातील लहान थोरांसह लोक लेझिम खेळत खेळत तसेच (हल्ली डी जे) क्या कर्णकडू परंतु नाचायला छान आय आवाजात नाचत नाचत हळू हळू कावडी श्री दैत्य मंदिराकडे येत. तिन्हीसांजेनंतरचा  शेरणी वाटप कार्यक्रम .त्यावेळी भेटणारे आप्तइष्ट मित्रमंडळी.भेटली की आनंद द्विगुणीत व्हायचा.क्वचित एखादी मोटर सायकल यात्रेत दिसायची.रात्रीच्या वेळी *हरिभाऊ बडे सह नंदारणी नगरकर यांचे लोकनाट्य पहाण्याचा आनंद तर  मंडळीनी अनुभवला.यात्रेत गेली आनेक वर्ष तोच तमाशा असायचा त्यातील हिरामण बडे  सोंगाड्या.आजही आठवतोय.* नंतर सकाळी  हजेरीचा कार्यक्रम व्हायचा. त्या हजेरीच्या वेळी यात्रा कमिटी तील लोक गुलाल लावायचे. तर काही लोक याला इतके द्या त्याला इतके द्या असे करत पण आनंद खूप येत होता.  दुपारी ४.००ला आखाडा सुरु व्हायचा आखाड्याची सूत्रे गावातील नामांकित मल्लांकडे असायची. (आखाडा कधी कधी मध्येच बंद पडायचा)आखाडा संपल्यानंतर मंदिराजवळ फक्त एक आणि एकच मिठाईचे दुकान असायचे. तिथे खूप गर्दी व्हायची रात्रौ ११वा श्री दैत्य बाबाचा  छबीना निघायचा शेवटपर्यंत लोक थांबायचे.दोन दिवसाची यात्रा आशा प्रकारे गुण्यागोविंदाने संपन्न व्हायची..............................आज हे सगळे दिवस डोळ्यासमोर येतात.जुन्या आठवणी उमाळुन येतात.आज पहिल्यांदाच चैत्री पाडव्याच्या यात्रेला आपण उपस्थित नव्हतो म्हणून मनातुन खूप वाईट वाटते.पण नाईलाज आहे.आज  सर्व ग्रामस्थ शरीराने देवळात नसलो तरी मनाने नक्की  आहोत.वरील भावना आपल्या सर्वांच्या मनातील आहे.केवळ त्या सर्व आठवणींना उजाळा देण्याचा सर्वांच्या वतीने केलेला हा प्रामाणिक  प्रयत्न .यात काही चुकले असल्यास क्षमस्व.जागेअभावी सर्व कार्यक्रमाचा उल्लेख करता आला नाही.आज चैती पाड्याच्या यात्रेच्या निमित्ताने.हा लेख लिहिला.आहे.आजच्या कोरोनाच्या विळख्यातुन दैत्य बाबा आपणा सर्वांना सुखरुप बाहेर काढील ही सद्भावना व्यक्त करुन पूर्ण विराम देतो.   

               भल भल निंबादैत्या महाराज की  जय 


           शब्दांकन *किरण भगवानराव नरसाळे*

मदर तेरेसा.. गाथा बलिदानाची

🇮🇳 गाथा बलिदानाची🇮🇳                                                                                    महान समाज सेविका         भारतरत्न...