Wednesday, 8 April 2020

कधीही न चुकलेली चैती पाड्याची यात्रा

    

 🌹कधीही न चुकलेली  चैती पाड्याची यात्रा🌹


                *💐एक अविस्मरणीय आनंद सोहळा💐*

 आज हा लेख मुद्दाम लिहायला घेतला आणि सरकन भूतकाळ डोळ्यासमोर आला. ३५० वर्षापूर्वीची आषाढी वारीची परंपरा ज्याप्रमाणे आजतागायत रुढ आहे. *पंढरीचा वारकरी! वारी चुको न दे हरी!!* अशी मागणी ज्याप्रमाणे वारकरी पंढरीच्या पांडुरंगाला करतो.अगदी तशीच मागणी दरवर्षी आपले नांदुरकर   ग्रामस्थ  श्री निंबा दैत्य महाराज  चरणी करतात. श्री दैत्य बाबा आमचीही चैत्री यात्रा कधीच चुकू देऊ नकोस.आणि खरोखरच माझी आतापर्यंत एकही चैत्री यात्रा चुकलेली नव्हती.अगदी परीक्षा काळातही.कधी यात्रा चुकवली नाही.आज अतिशय जड अंतकरणाने आजच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे.आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी शरीराने जरी घरात आसलो तरी मनाने मात्र श्री दैत्य बाबाच्या प्रांगणात आहोत.गेल्या पंचवीस वर्षातील चैत्री  पाडा यात्रा अनुभवली .यात्रेच्या अगोदर महिनाभर ही तयारी सुरु व्हायची.आम्ही खूप लहान होतो नवीन कपडे आणायला  खरवंडी  (फार पूर्वी तोंडोळी)कापड दुकानात दैत्य नांदूर कर गर्दी करायचे .मांजरपाट ,हरक, क्वचित टेरिकाॕट असे कापड  घेतल्यावर  दुकानाशेजारी  टेलरिंगचे दुकान असायचे तिथे सर्व जण कपडे शिवायला टाकायचे. यात्रेच्या आधी एक दिवस कपडे शिऊन मिळायचे. जयंतीचे भजन.कोणी कोणी आदल्याच दिवशी श्री संत एकनाथ महाराजांचे पैठण येथे कावडी आणण्यासाठी जायचे . तर काही जण पहाटेच काशिकेदार येथे  जाऊन खोलवर आसलेलं पाणी शेंदायचे आणि किमान यात्रेच्या दिवशी प्रत्येक जण पाच ते सहा कावडी आणायचाच.पुरती दमछाक व्हायची.पण यात्रेचा उत्साहात शीणभाग कुठल्या कुठे पळून जायचा.सर्व देवाना नारळ फोडण्यात आणि नैवद्य (तेव्हाच्या भाषेत निवाद )  घेऊन जाण्यात एक वेगळा आनंद सकाळी ७.००च्या आत.नवीन कपडे घालुन चौकातील गणपती मंदिरात हजर.मग दैत्य बाबाच दर्शन घेतल्यानंतरचा आनंद अवर्णनीय.दोन रूपयाचा प्लॕस्टिकचा  लाल चष्मा आणि एक रुपयाचे मनगटी घड्याळ घेतलं की गाडी खूष व्हायची .या वस्तूसाठी खेळणीची दुकाने पूर्वी नव्हती . बाहेरगावतील  पाहुणे तसेच गावातील बाहेरगावी असलेले सर्व नोकरदार  मंडळी तसेच गावातील सर्व  सासरला असलेल्या लेकी   आणण्यासाठी किंवा मुराळकी आणण्यासाठी गाड्या (पूर्वी बैल गाड्या )जायच्या.अनेक जण  येण्याची कसलीच सोय नसल्यामुळे भर उन्हात पायी पायी येणारांची तारांबळ होतअसे.

 श्री दैत्य बाबाचरणी असणा-या श्रध्देमुळे भाविकांना कसलाच त्रास होत नसे.  सकाळी कवडी व  त्यांची मिरवणूक अतिशय उत्साहात व आनंदात. होत होती.
गावातील लहान थोरांसह लोक लेझिम खेळत खेळत तसेच (हल्ली डी जे) क्या कर्णकडू परंतु नाचायला छान आय आवाजात नाचत नाचत हळू हळू कावडी श्री दैत्य मंदिराकडे येत. तिन्हीसांजेनंतरचा  शेरणी वाटप कार्यक्रम .त्यावेळी भेटणारे आप्तइष्ट मित्रमंडळी.भेटली की आनंद द्विगुणीत व्हायचा.क्वचित एखादी मोटर सायकल यात्रेत दिसायची.रात्रीच्या वेळी *हरिभाऊ बडे सह नंदारणी नगरकर यांचे लोकनाट्य पहाण्याचा आनंद तर  मंडळीनी अनुभवला.यात्रेत गेली आनेक वर्ष तोच तमाशा असायचा त्यातील हिरामण बडे  सोंगाड्या.आजही आठवतोय.* नंतर सकाळी  हजेरीचा कार्यक्रम व्हायचा. त्या हजेरीच्या वेळी यात्रा कमिटी तील लोक गुलाल लावायचे. तर काही लोक याला इतके द्या त्याला इतके द्या असे करत पण आनंद खूप येत होता.  दुपारी ४.००ला आखाडा सुरु व्हायचा आखाड्याची सूत्रे गावातील नामांकित मल्लांकडे असायची. (आखाडा कधी कधी मध्येच बंद पडायचा)आखाडा संपल्यानंतर मंदिराजवळ फक्त एक आणि एकच मिठाईचे दुकान असायचे. तिथे खूप गर्दी व्हायची रात्रौ ११वा श्री दैत्य बाबाचा  छबीना निघायचा शेवटपर्यंत लोक थांबायचे.दोन दिवसाची यात्रा आशा प्रकारे गुण्यागोविंदाने संपन्न व्हायची..............................आज हे सगळे दिवस डोळ्यासमोर येतात.जुन्या आठवणी उमाळुन येतात.आज पहिल्यांदाच चैत्री पाडव्याच्या यात्रेला आपण उपस्थित नव्हतो म्हणून मनातुन खूप वाईट वाटते.पण नाईलाज आहे.आज  सर्व ग्रामस्थ शरीराने देवळात नसलो तरी मनाने नक्की  आहोत.वरील भावना आपल्या सर्वांच्या मनातील आहे.केवळ त्या सर्व आठवणींना उजाळा देण्याचा सर्वांच्या वतीने केलेला हा प्रामाणिक  प्रयत्न .यात काही चुकले असल्यास क्षमस्व.जागेअभावी सर्व कार्यक्रमाचा उल्लेख करता आला नाही.आज चैती पाड्याच्या यात्रेच्या निमित्ताने.हा लेख लिहिला.आहे.आजच्या कोरोनाच्या विळख्यातुन दैत्य बाबा आपणा सर्वांना सुखरुप बाहेर काढील ही सद्भावना व्यक्त करुन पूर्ण विराम देतो.   

               भल भल निंबादैत्या महाराज की  जय 


           शब्दांकन *किरण भगवानराव नरसाळे*

Monday, 6 April 2020

एक अवलिया कलाकार माणूस

एक अवलिया कलाकार माणूस - निळू फुले


             💐आज नटसम्राट निळु फुले यांची जयंती💐
                 🙏🏼 त्यांना विनम्र अभिवादन🙏🏼

पुण्याहून साताऱ्याकडे जाताना उजव्या बाजूला एक हॉटेल लागायचं, त्यावर निळू फुले यांचे चित्र होतं आणि लिहलेले असायचं, "मोठा माणूस". फक्त खलनायकी भूमिका पाहिलेल्या लोकांना नीलकंठ कृष्णाजी फुले उर्फ निळूभाऊंचे हे मोठे सामाजिक कार्यकर्ते होते हे अभावानेच माहित आहे. प्रत्यक्ष जीवनात ते मितभाषी आणि संकोची वृत्तीचे होते हे सांगूनही खरं वाटणार नाही. श्रीराम लागू यांना आम्ही भेटायला (मुलाखत) गेलो असताना डॉक्टरांना मी प्रश्न विचारला होता की निळूभाऊंबरोबर तुमचे संबंध कसे होते? तर त्यावर लागू म्हणाले की फार मोठ्या मनाचा माणूस आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हा प्रसंग मी स्वतः अनुभवला आहे त्यामुळे निळूभाऊ माझ्यासाठी वेगळं समीकरण बनले, मी अनेक पुस्तकं, सेवादल व विवेक मासिक व दिवाळी अंक वाचत हा माणूस समजत गेलो. महाराष्ट्रात अनेक मोठे कलावंत होऊन गेले, पण दुर्गमातल्या दुर्गम खेड्यापर्यंत आणि तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली जी काही मोजकी नावे असतील, त्यात निळू फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. 
ते सुरुवातीपासूनच राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते. ते निवडणुकीच्या काळात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी जात होते. सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत कार्यरत होते. अशा ठिकाणी त्यांच्यातला नट कधीच अस्तित्वात नसायचा. विनम्रता आणि भिडस्तपणा एवढा की, आजूबाजूच्या माणसांना संकोच वाटावा.  ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण करत ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर त्यांनी साकारलेली ‘झेलेअण्णांची’ भूमिका निळू फुलेंना चित्रपट जगतात एक वेगळीच ओळख देउन गेली. मराठी चित्रपट सृष्टीत ‘सामना’, ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भुजंग’ यांसारख्या चित्रपटातून निळूभाउंनी साकारलेल्या भूमिका आजतागायत अजरामर आहेत. नाटक आणि सिनेमामधून त्यांनी साकारलेल्या नायकी-खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली खरी, पण निळू फुलेंनी साकारलेल्या जवळपास सर्वच खलनायकी पात्रांना प्रेक्षकांची खास पसंती मिळाली. नाट्यक्षेत्रातही त्यांची ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’ ही नाटके विशेष उल्लेखनीय.
कराड येथे एकदा नाट्यसंमेलन भरले होते तेव्हा मनोहर जोशी हे संमेलनाध्यक्ष होते  आणि लोकसभेचे देखील अध्यक्ष होते ते विजय तेंडुलकर यांची महती सांगत गुणगान करीत होते तेव्हा निळूभाऊ त्यांचे भाषण वाचून आले आणि दुसऱ्या दिवशी कडाडले की .... . . . ‘काल लोकसभेचे सभापती माननीय मनोहर जोशी म्हणाले की, तेंडुलकर हे मोठे नाटककार होते. पण याच जोशींना मी पंचवीस वर्षापूर्वी निदर्शनं करताना आणि नाटय़गृहातल्या खुच्र्याची, लाइटची मोडतोड करताना पाहिलंय. कलावंतांना स्टेजवर शॉक बसायचे म्हणून कलावंत घाबरायचे. आणि आज हे सांगताहेत तेंडुलकर थोर नाटककार होते म्हणून. तेंडुलकर मोठे होते, हे समजायला यांना पंचवीस वर्षे लागली. म्हणून म्हणतो, अहो जरा वाचत जा. विचार करीत जा. समजत नसेल ते समजून घेत जा...’  असा होता हा माणूस....... सज्जन परंतु रोखठोकपणे सामाजिक बांधिलकी जपत प्रहार करणारे. बंदिस्त नसलेल्या लोकनाट्यात हजरजबाबीपणाचे दर्शन घडविणारे निळूभाऊ.. एरवी नम्र असलेले मात्र, रंगमंचावर दरारा असलेले..
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना अभिनय क्षेत्रात असल्यामुळे मुलगी गार्गीला पुरेसा वेळ देता येत नसे. मात्र, तरीही वेळ मिळाल्यावर गार्गीशी नाटक, चित्रपट, अभिनय या विविध विषयांवर चर्चा करण्यास फुले प्राधान्य देत. त्यांनी गार्गीला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. वडिलांच्या बऱ्या-वाईट भूमिकेबद्दल ती त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायची. वडीलांच्या नावाचा प्रभाव न वापरता तिने जिद्दीने नाटक-सिनेमा क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. तुला पाहते रे मध्ये गार्गी फुले यांना तुम्ही पाहिलं असेलच.
जाता जाता एक घटना सांगतो आणि तुम्हीच ठरवा की हा मोठा माणूस होता की नाही ते....
...  राम नगरकर यांनी ‘रामनगरी’मध्ये त्या संदर्भातली आठवण लिहिलीय. १९७२च्या दुष्काळातली ही घटना आहे. त्या काळात राम नगरकरही निळूभाऊंच्या घरी राहायला, जेवायला होते. निळूभाऊ त्यांच्याकडून काहीही घेत नव्हते. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सेवादलानं गोळा केलेलं धान्य निळूभाऊंच्या घरी ठेवलं होतं. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस निळूभाऊ आणि राम नगरकर बाहेर जायला निघतात, तेवढ्यात निळूभाऊंची आई त्यांना हाक मारून बोलावते. म्हणते, थोडे पैसे दे. निळूभाऊ म्हणतात, माझ्याकडं पैसे नाहीत. आई म्हणते, घरात धान्याचा कण नाही, काय करायचं? त्यावर ते म्हणतात, काहीही कर. त्या माऊलीला साहजिकच घरातल्या धान्याच्या पोत्यांची आठवण येते. ती सहज म्हणते, यातलं पायलीभर धान्य घेऊ का, दोन दिवसांनी पैसे आल्यावर त्यात ते परत टाकूया. त्यावर निळूभाऊ तिला सांगतात, ‘ते लोकांचं आहे. उपाशी मेलो तरी चालेल, पण त्यातल्या दाण्यालाही हात लावायचा नाही.’ 
सार्वजनिक जीवनात काम करताना कार्यकर्त्यांनं कसं वागावं, यासाठी निळू फुले यांचं उदाहरण देता येईल... वयाच्या ७८व्या वर्षी गळ्याचा कॅन्सर (oesophagal cancer) होऊन ते आजच्याच दिवशी २००९ साली आपल्यातून गेले. निळूभाऊ त्यांची पत्नी रजनी फुले या निळू भाऊंनंतर एक वर्ष्यात आजराने निवर्तल्या होत्या, एक भक्कम आधार असायचा निळूभाऊंचा तो गेला आणि पाठोपाठ त्याही...
खरंच या थोर माणसाला आज त्यांच्या पुण्यतिथी दिवशी नमन करून श्रद्धांजली अर्पण करावीशी वाटली.
(लेखक अज्ञात)

आज निळु फुले यांची जयंती आहे त्यांना विनम्र अभिवादन

Sunday, 5 April 2020

जगणे आणि मरणे

                 जगणं आणि मरण


मला असं वाटतं की मानवजातीला म्हणजेच आपणाला खरच जीवन जगता आल आहे का? जगता येईल का? जगतोय काय? 
अशाप्रकराचे अनेक विविध प्रश्न पडतात. होय की नाही..
   खरं म्हणजे आपण जीवन जगत असताना अस्या भावनेने आणि हावरातासारखे जगतो. शेवटी मारायचं आहे हे ठावूक असूनही मानव पैसे ,संपत्ती, माया,तसेच विविध गोष्टी साठी जीवाचे रण करतात. आपण मिळवलेल्या सर्व गोष्टी माणूस मृत्यू नंतर सोबत नेतो का नाही ना..मग कशासाठी.?
  जीवन जगताना समाधानाने आणि स्वाभिमानाने जगल पाहिजे .मला तर वाटत की माणसाला मरणाची भीती असावी म्हणजेच माणूस जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. म्हणूनच गावाची स्मशानभूमी ही गावाच्या मध्यभागी असली पाहिजे.
    स्मशानभूमी ही गावाच्या बाहेर नाही तर गावाच्या किंवा शहराच्या मध्यभागी चौकात असायल हवी.  म्हणजे माणसाला ज्या ठिकाणाहून दिवसातून कित्येक वेळा जावे लागते त्या ठिकाणी स्मशान असले पाहिजे. त्यामुळे  माणसाला तिथून जाताना अर्धवट जळालेली प्रेते  आणि जळणारी प्रेते पाहून  मृत्यूची आठवण होईल. उद्या मारायचं आहे  याचा आजच्या माणसाला बहुतेक विसर पडला आहे असावा. एके दिवशी आपण सर्वांना मारायचं आहे असे तुम्ही म्हणत असलात तरी तुम्ही त्यात आपला समावेश करत नाहीत.
 म्हणूनच म्हणतो कशाला हा अट्टाहास .
जीवन आहे तोपर्यंत जगून घ्यावं
 हा जन्म पुन्हा नाही..पुन्हा पुन्हा नाही..बहुमोल हे जीवन .म्हणून..
आरे माणसा माणसा तू माणूस बन.


                   
                          प्रा. किरण भगवानराव नरसाळे 

मदर तेरेसा.. गाथा बलिदानाची

🇮🇳 गाथा बलिदानाची🇮🇳                                                                                    महान समाज सेविका         भारतरत्न...