जगणं आणि मरण
मला असं वाटतं की मानवजातीला म्हणजेच आपणाला खरच जीवन जगता आल आहे का? जगता येईल का? जगतोय काय?
अशाप्रकराचे अनेक विविध प्रश्न पडतात. होय की नाही..
खरं म्हणजे आपण जीवन जगत असताना अस्या भावनेने आणि हावरातासारखे जगतो. शेवटी मारायचं आहे हे ठावूक असूनही मानव पैसे ,संपत्ती, माया,तसेच विविध गोष्टी साठी जीवाचे रण करतात. आपण मिळवलेल्या सर्व गोष्टी माणूस मृत्यू नंतर सोबत नेतो का नाही ना..मग कशासाठी.?
जीवन जगताना समाधानाने आणि स्वाभिमानाने जगल पाहिजे .मला तर वाटत की माणसाला मरणाची भीती असावी म्हणजेच माणूस जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. म्हणूनच गावाची स्मशानभूमी ही गावाच्या मध्यभागी असली पाहिजे.
स्मशानभूमी ही गावाच्या बाहेर नाही तर गावाच्या किंवा शहराच्या मध्यभागी चौकात असायल हवी. म्हणजे माणसाला ज्या ठिकाणाहून दिवसातून कित्येक वेळा जावे लागते त्या ठिकाणी स्मशान असले पाहिजे. त्यामुळे माणसाला तिथून जाताना अर्धवट जळालेली प्रेते आणि जळणारी प्रेते पाहून मृत्यूची आठवण होईल. उद्या मारायचं आहे याचा आजच्या माणसाला बहुतेक विसर पडला आहे असावा. एके दिवशी आपण सर्वांना मारायचं आहे असे तुम्ही म्हणत असलात तरी तुम्ही त्यात आपला समावेश करत नाहीत.
म्हणूनच म्हणतो कशाला हा अट्टाहास .
जीवन आहे तोपर्यंत जगून घ्यावं
हा जन्म पुन्हा नाही..पुन्हा पुन्हा नाही..बहुमोल हे जीवन .म्हणून..
आरे माणसा माणसा तू माणूस बन.

Nice one,🙏🙏
ReplyDelete